बी.जे.मार्केट परिसरातून एकाचा लांबविला मोबाईल

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळ्याकडून बुलढाणा येथे जाण्यासाठी जळगाव शहरात आलेल्या एका तरूणाच्या हातातील मोबाईल अज्ञात भामट्यांने लांबविल्याची घटना शनीवार १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी येथे अक्षय सुरेश काळवाघे हा तरुण वास्तव्यास असून तो बुलढाणा येथील महाराष्ट्र अर्बन बँकेत रोखपाल म्हणून नोकरीस आहे. शनीवारी १९ रोजी धूळे येथे एसबीआय बँकेच्या ज्युनिअर क्लर्क या पदाची परीक्षा देवून तरुण रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगावात आला. शहरातील बी. जे. मार्केट परिसरातील साखला मंगल कार्यालयासमोरुन रात्री ९ वाजता पायी जात असतांना हातात हेल्मेट घेवून एक इसमाने तरुणाला विश्वासात घेवून त्याची विचारपूस केली. तसेच माझा फोन स्विचऑफ झाला असून तुझ्या मोबाईलवरुन फोन करायचा आहे असे त्याने सांगितले. तरुणाने लागलीच आपला फोन त्या इसमाला दिला तो इसम बोलतांना रोडाच्या बाजुला गेला.

मोबाईलवर बोलत असलेल्या इसमावर अक्षयला शंका आल्याने तो त्याच्याजवळ गेला. परंतु तो इसम अक्षयचा मोबाईल घेवून मार्केटमध्ये लावलेल्या दुचाकीवरुन पसार झाला. दरम्यान, त्या इसमाला चौकात असलेल्या शुभम जाधव व त्याच्या दोघ मित्रांनी पळून जातांना बघितले. तरुणाला आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्याने जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content