बीज संकलित करून पर्यावरण संवर्धनासाठी एका ध्येयवेड्याची धडपड!

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  मानवाने  स्वार्थासाठी जिवंत झाडांची कत्तल करू लागल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. यावर मात करण्यासाठी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी बीज संकलनाचा अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

मनुष्य हा स्वतःच्या फायद्यासाठी जंगलातोड करून  अतिक्रमण करू लागल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यात झाडांनी गच्च भरलेला जंगल हे  नाहिसे  होत  आहेत. यास  आळा घालून पुन्हा पर्यावरणाचा संवर्धन करण्यासाठी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी बी संकलन करून त्यांची रुजवण करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. श्री. राठोड हे  जंगलात जाऊन  झाडांचे बिया संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. या  संकलित केलेल्या बियांची लागवड करून पर्यावरण संवर्धन करणार  असल्याची माहिती अशोक राठोड यांनी यावेळी दिली.  त्यांनी  उपक्रमाविषयी जनजागृती करून ग्रामस्थांना हि सामावून घेतले आहे. त्यांच्या या वाखाणण्याजोगा कार्याला पर्यावरण प्रेमी राकेश गवळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.  बिया संकलनामध्ये त्यांनी जंगली गुंज, धामोडा, जंगली लोखंडी, पळस, अंजन, कारंज, गुलमोहर, कडूनिंब, सुबाभूळ, सलइ इ. झाडांचे बिया संकलित केल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.