जळगाव प्रतिनिधी । बहुचर्चीत भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी कंडारेचा वाहन चालकास आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
कमलाकर भिकाजी कोळी असे चालकाचे नाव आहे. कमलाकर हा आज सकाळी बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेत वाहन लावण्यासाठी आला असता आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. चालकाची कसून चौकशी केली असता जितेंद्र कंडारे याला औरंगाबाद ते नगर नेमके कुठे सोडले याबाबत समाधानकारक उत्तर मिळाली नाही.