बायडेन ५० कोटी फायझर लशी दान करणार

 

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिका प्रशासन कोरोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी  दिलेल्या माहितीनुसर अध्यक्ष जो बायडेन G-7 बैठकीत घोषणा करतील

 

जगातील बऱ्याच देशात लशीची कमतरता आहे. जो बायडेन निर्णयामुळे त्या देशांना मदत होईल. अमेरिकेत लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकांना लशीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यानंतर तेथील कोरोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.

 

अध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटनमधील ७ देशांसोबत G-7 च्या बैठकीपूर्वी लस दान करण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा स्थानिक माध्यमांनी बायडेन यांना जगाला लस देण्याच्या धोरणा विषयी विचारले तेव्हा त्यांनी, लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगितले.

 

बायडेन ही घोषणा करण्यासाठी फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांच्यासमवेत हजर राहण्याची शक्यता आहे. ही घोषणा अमेरिकेच्या हितासाठी नसून जगाच्या हितासाठी असेल, असेही सांगण्यात आले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.