बापरे…धरणगाव तालुक्यात १२ नवीन कोरोना पॉझिटीव्ह !

शेअर करा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आज १२ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील ४, झुरखेडा १ तर पाळधी खुर्द येथील ७ रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

store advt

 

 

रविवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये धरणगाव तालुक्यात १२ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरात ४ त्यात मराठे गल्लीत १, हनुमान नगर १, परिहार नगर २, झुरखेडा १ तर पाळधी खुर्द येथील ७ रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. संबंधीत रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या १२ रूग्णांमुळे तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १६२ इतकी झाली आहे. यातील १३ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत ९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ४६ रुग्ण उपचार घेत आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!