बांधकाम साईटवरुन लंपास केल्या ८२ सेंट्रींग प्लेटा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील बांधकामाच्या ठिकाणी स्लॅबसाठी लागणार्‍या ४१ हजारांच्या ८२ सेंट्रींगच्या प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे विनोद रामचंद्र राठोड हे बांधकाम मिस्तरी व ठेकेदार आहे. शुक्रवार २३ जून रोजी त्यांनी गावातील बैठक हॉल परिसरात राहणार्‍या मनिषाताई परदेशी यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. याठिकाणी स्लॅब टाकण्यासाठी सेंट्रींग प्लेटा ठेवलेल्या होत्या. २३ ते २४ जून रोजी दरम्यान, चोरट्याने याठिकाणाहून ४१ हजार रुपये किंमतीच्या ८२ नग लोखंडी प्लेटा चोरुन नेल्या. याप्रकरणी शनिवारी २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे हे करीत आहे.

Protected Content