बहिणाबाई शाळेजवळून एकाची दुचाकी लांबविली

रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल ahinabai drove one of the bikes near the school

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भगवान नगरातील बहिणाबाई शाळेजवळून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरीष मधुकर भोळे (वय-३६) रा. बहिणाबाई शाळेजवळ भगवान नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बहिणाबाई शाळेजवळ त्यांनी (एमएच १९ सीएन ३२६२) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती.  बुधवार २२ जून रोजी सकाळी ४.३० ते ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. सकाळी १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!