बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आ.किशोर अप्पा पाटील यांची नुियक्ती

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव विद्यापीठात नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

नुकतेच त्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठ्ये यांचे कडील पत्र प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत असून आपण विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रयत्न करून महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासनात उत्तम समन्वयक म्हणून काम करतांना विद्यार्थी वर्गाला न्याय देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content