बहिणाबाई कोविड केअर सेंटर येथून बरे झालेले आजी-आजोबा  परतले घरी 

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय तंत्र निकेतनच्या मुलींच्या वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटर येथील दाखल असलेले आजी-आजोबा हे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

बहिणाबाई कोविड केअर सेंटरमधून यशस्वी उपचारानंतर ८२ वर्षाचे आजोबा व ८० वर्षाच्या आजी ह्या बरे होऊन त्यांच्या घरी परतले. यावेळी लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्टस फाउंडेशन व लोक संघर्ष मोर्चातर्फे मनस्वी आंनद होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बहिणाबाई कोविड केअर सेंटरमध्ये सर्वांनी सेवाभावी वृत्तीने केलेल्या देखभालीने भारावून गेल्याची प्रतिक्रया आजी-आजोबांनी दिली.  लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्टस फाउंडेशन व लोक संघर्ष मोर्चातर्फे मनस्वी आंनद होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दरम्यान, कोविड केअर सेंटर येथून जपर्यत १५२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. याप्रसंगी बहिणाबाई कोविड केअर सेंटरचे पदाधिकारी प्रतिभा शिंदे, चंदन कोल्हे , सचिन धांडे, चंदन अत्तरदे, अभिजित महाजन, डॉ. क्षितिज पवार, प्रमोद पाटील, पराग महाजन , सुमित साळुंके आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.