बळीराजा अ‍ॅग्रोतर्फे शतकर्‍यांना मोफत रोपे वाटप

 

एरंडोल  : प्रतिनिधी ।  येथील बळीराजा अ‍ॅग्रोचे संचालक भुषण पाटील यांनी तालूक्यातील शेतकर्‍यांना मोफत रोपे वाटप  केली त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 

भूषण पाटील यांनी आपल्या उक्रमात एक हजार रोपे वाटण्याचा मानस ठेवला आहे. यावेळी नाना महाजन ( विखरण) , संजय पाटील ( उमरदे ), अभिमन बडगुजर ( पिंपळकोठा ), प्रशांत पाटील ( भातखेडा ), भूषण पाटील ( लोणी ), निंबा महाजन ( एरंडोल ), महेंद्रसिंग पाटील ( खडके  ), रोहित पाटील ( भातखेडा ), राजेश महाजन ( खेडी ) आदी शेतकर्‍यांना कडूनिंब, पिंपळ, वड, चिंच, उंबर आदी रोपांचे वाटप केले.

 

याप्रसंगी मनोहर पाटील, रविंद्र मिस्तरी, कृष्णा पाटील, किर्ती़कुमार शिसोदीया, धर्मेद्र पाटील आदी उपस्थित होते. लावलेल्या झाडांना पाणी घालून जगविण्याचा संकल्प देखील यावेळी शेतकर्‍यांनी केला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!