बदनामीच्या भितीने अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । इन्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्यामुळे बदनामी होईल या भितीने शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरुन पलायन गेले आहे. याप्रकरणी  रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल झाला आहे

 

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीचे तिच इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाले. त्यामुळे बदनामी होईल या भितीने अल्पवयीन मुलगी सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घरात कुणाला काहीएक न सांगता निघून गेली आहे. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी पुन्हा परत आली नाही. अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय सुध्दा मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!