बजरंग बोगदा व ममुराबाद रोडवरील रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकीची कोंडी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे ममुराबाद रोडवरील रेल्वे पुल आणि प्रेम नगरातील बजरंग रेल्वे बोगद्यात पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान जळगाव महानगर पालिकेचे महापौर जयश्री महाजन व प्रशासन यांनी तत्काळ दखल घेत सांडपाण्याची विल्हेवाट कायमस्वरूपी लावावी अशी मागणी काँग्रेस सेवादलचे यंग ब्रिगेडचे महानगरप्रमुख गोकुळ चव्हाण यांनी दिली. 

जळगाव शहरातील ममुराबाद नाक्याजवळील रेल्वे पुलाजवळ लेंडी नाला आहे. या नाल्यातून शहरातील विविध भागातील सांडपाणी जाते. आज शुक्रवारी ९ जुलै रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान जळगाव शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नाल्याला मोठा पुर आल्याने काही भागातील घरांमध्ये पाणी देखील गेले परंतू रेल्वेपुला खालून जाण्याऱ्या रस्त्यावर देखील तीन फुटापर्यंत पाणी साचलेले होते. महानगरपालिकेच्या प्रशानाने पावसाळापुर्वी नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे हे पाणी घरात व रस्त्यावर आले आहे असा आरोप काँग्रेस सेवादलचे यंग ब्रिगेडचे महानगरप्रमुख गोकुळ चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे शहरातील प्रेम नगराजवळ असलेल्या बजरंग रेल्वे बोगद्यात देखील अश्याच पध्दतीने ३ ते ४ फुट पर्यंत पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची रहदारी पुर्णपणे थप्प झाली होती. पावसाच्या पाण्यामुळे असा प्रकार कायम होत असल्यामुळे महानगरपालिकेचे महापौर जयश्री महाजन आणि आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी पावसाचे पाणी आणि सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपीचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील काँग्रेस सेवादलचे यंग ब्रिगेडचे महानगरप्रमुख गोकुळ चव्हाण यांनी केली आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!