बकरी चोरण्यासाठी महागड्या वाहनाचा वापर

नागरिकांच्या सतर्कतेने भामटा पोलिसांच्या ताब्यात

शेअर करा !

 

यावल, प्रतिनिधी । येथील शहरालगत यावल चोपडा रोडवर असलेल्या नवीन विस्तारीत अकसानगर वसाहतीतुन चारचाकी वाहनातुन बकऱ्या चोरणाऱ्या भामट्यास पकडण्यात नागरीकांना यश आले असून या भामट्यास वाहनासह पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अद्याप कुणीही तक्रारदार समोर न आल्याने  गुन्हा दाखल  करण्यात आलेले नसल्याचे पोलीस सुत्रांकडुन कळते. 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,  यावल शहरातील अक्सानगर परिसरातुन आज सोमवार दि. १ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमपी०९जी के९४५३या महागडया स्वीप्ट चार चाकी वाहनातुनही ईम्रान रफीक पठाण (वय ४८ वर्ष राह. ईन्दौर मध्य प्रदेश) ही व्यक्ती चार बकऱ्या किमत ४५ हजार रूपये गाडीच्या डिकीत भरून चोरून घेवुन जात होता.  अक्सानगर परिसरातुन अजुन काही बकऱ्या चोरीच्या प्रयत्नात असतांना सर्तक व जागृत नागरिकांना  तो आढळुन आलेल्याने परिसरातील नागरीकांनी त्यास रंगेहाथ पकडुन त्यास चांगला चोप दिला.  नंतर घटनेचे वृत्त कळताच तात्काळ दखल घेत पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी असलम रवान, भुषण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली व बकऱ्या चोरी करणाऱ्या ईम्रान रफीक पठाण यास वाहनासह ताब्यात घेतले आहे. घटना स्थळावरून दोन जणं फरार होण्यात यशस्वी झाले. सदरच्या या बकऱ्या फैजपुर परिसरातुन चोरून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बकऱ्या चोरणाऱ्या चोरट्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसापासुन शहरातील चांद नगर, आयशानगर आदी परिसरातुन अनेकांच्या बकऱ्या चोरीस गेल्या असल्याची माहीती समोर येत आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!