बंद दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रसलपुर येथे बंद दुकान फोडून रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश उर्फ नंदू लक्ष्‍मण महाजन (वय-४६) रा. रसलपुर ता.रावेर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. निलेश यांचे योगेश्वर ट्रेंडर्स नावाचे गावातच दुकान आहे. १५ नोव्हेंबर रात्री आठ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा मागचा दरवाजा तोडून दुकानातील २ हजार रुपयांची रोकड आणि ८ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. हा प्रकार बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला आहे. याबाबत नीलेश महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जगदीश पाटील करीत आहे.

Protected Content