फैजपूर शहरात वादळीवाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरासह परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळीवारा व पाऊसमुळे अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या तारा तुटून पडल्या आहे. वीजपुरवठा पुर्वावत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी ४ जून रोजी दुपारी १२ वाजता वादळी वारा आणि पाऊसामुळे फैजपूर शहरातील व इतर परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. तुटलेल्या तारा इत्यादी, माहिती मिळाल्यामुळे अपघात ग्रस्त भाग वेगळा करून इतरांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहे. तरी कृपया सहकार्य करावे व तुटलेल्या वीज तार, महावितरण कंपनीचे उपकरणे जसे पोल इत्यादी पासून लांब राहावे व इतरांनाही जवळपास जाऊ न देता फैजपूर महावितरण कक्ष कर्यालयास त्वरित योग्य ती माहिती द्यावी ही विनंती जेणेकरून अपघात होणार नाही. काळजी घ्यावी. असे आवाहन महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.

Protected Content