फैजपूर येथे १५ लाखांचा गुटखा जप्त; चार जणांवर गुन्हा दाखल

फैजपूर ता यावल प्रतिनिधी । शहादा येथून वाहनात भरलेला गुटखा सावदा शहराकडून परराज्यात जात असतांना फैजपूर पोलिसांनी कारवाई करत  सुमारे 15 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, फैजपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रविवारी दुपारी महेंद्रा पिकअप वाहन (एमएच ४६ ई ६१२५) ची तपासणी केल्यानंतर त्यात १५ लाख ७० हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा आढळला. या प्रकरणी संशयीत आरोपी अरबाजखान नवाज खान पठाण व शे.जमिलोद्दीन रफियोद्दीन (शहादा, जि.नंदुरबार), साहिल रफिक मेमन (शहादा, जि.नंदुरबार) व मोहसीन शेख (अडावद) यांच्याविरोधात  राजेश बर्‍हाटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुटखा व वाहनासह १९ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अरबाजखान नवाज खान पठाण व शे.जमिलोद्दीन रफियोद्दीन (शहादा, जि.नंदुरबार) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहा.निरीक्षक सिद्धेश्‍वर आखेगावकर, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार देविदास सुरदास, हवालदार राजेश बर्‍हाटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, कॉन्स्टेबल महेंद्र महाजन, चेतन महाजन, होमगार्ड श्रीकांत इंगळे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!