फैजपूर येथे नितीन महाजन यांचा दशमाता गृपतर्फे सत्कार

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । शहरातील दिव्यांग सेनेचे शहराध्यक्ष नितीन महाजन यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याने दशमाता ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्यात.

नितीन महाजन यांची निराधार योजनेत जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच दिव्यांग प्रतिनिधीच्या नावाला शिफारस केलेबद्दल यावल- रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. फैजपूर गावासह तालुक्यातील दिव्यांग व निराधार व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहु असे नितीन महाजन यांनी सांगितले.

शहरातील दशमाता ग्रुपचे अध्यक्ष किरण कोल्हे, संजय चौधरी, गौरव चौधरी, ललित वाघूळदे, प्रविण कोल्हे, गोपाळ चौधरी, विनोद गलवाडे, ऊमेश वायकोळे, गौरव चौधरी, देवेंद्र चौधरी, जयश्री चौधरी, निलेश पटील, उत्कर्षा कोल्हे , साक्षी कोल्हे , नाना मोची यांच्यासह गृपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!