फैजपूर येथे गांधी जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्तीतर्फे चर्चासत्राचे

 

फैजपूर, प्रतिनिधी । महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृपतर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अहिंसेच्या मार्गाने देखील खुप मोठी क्रांती घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच महात्मा गांधी आहेत असे प्रतिपादन नपा गटनेते कलिम खान मण्यार यांनी व्यक्त केले. तर देशाला सध्याच्या युद्धजन्य परिस्थीतीत लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज असल्याचे खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी सांगितले. यावेळी फैजपूर नगरपरिषद काँग्रेस गटनेते कलिम खान मन्यार, शिवसेना गटनेते अमोल निंबाळे, खान्देश नारीशक्ती संघटना अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, भाजप सरचिटणीस संजय भावसार, भाजप माजी शहराध्यक्ष तसेच वाल्मिकी समाज शहराध्यक्ष संजय रल, जनसंघ प्रदेश उपाध्यक्ष संदिप पाटील, देवेंद्र झोपे, जगन्नाथ नारखेडे, नाझीम शेख, सुरेश नारखेडे, पार्थ झोपे, शशिकला चौधरी, अर्चना भारंबे, नलीनी नारखेडे, रुक्मिणी नारखेडे, गुणेश्री झोपे आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.