फैजपूरात भाजपतर्फे आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यसभेत महाराष्ट्र राज्यातून तिन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

 

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर तीन उमेदवारांची निवड झाल्याबद्दल स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस चौक येथे भारतीय जनता पार्टी फैजपूर च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी फैजपूर शहराध्यक्ष अंनता नेहते, बी. के. चौधरी, माजी नगराध्यक्ष बी. के. काका चौधरी, पिंटूभाऊ निलेश राणे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे,ओ बी सी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पिंटूभाऊ तेली,अनिरुद्ध सरोदे,यावल तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, कोषाध्यक्ष रघुनाथ कुंभार, भाजपा युवा मोर्चा यावल तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, प्रतीक वारके, संदीप भारंबे, किरण चौधरी, राजाभाऊ चौधरी, राजेश महाजन, वसंत परदेशी, जितेंद्र वर्मा, संजय भावसार, नरेंद्र चौधरी,आदीवासी मोर्चा शाखाध्यक्ष रशीद तडवी, युवा मोर्चा शाखाध्यक्ष श्याम भंगाळे,अक्षय परदेशी, झील परदेशी. भारतीय जनता पार्टी फैजपूर शहर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!