जळगाव प्रतिनिधी । सेंट्रल फुले मार्केट येथील दोन दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दोन हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपती नगरातील रहिवासी कन्हैय्यालाल अर्जुनदास छाबडिया (वय-५३) यांचे सेंट्रल फुले मार्केट येथे परसराम पोल्ट्री नावाने दुकान आहे. शेजारी दिलीप वालेचा यांचे किरणा दुकान आहे. गुरूवारी रात्री ८ वाजता दोघे दुकानांना कुलूप लावून घरी निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास मार्केट दुकान अध्यक्ष रमेश मतानी यांनी कन्हैय्यालाल यांना फोन करून त्यांच्या दुकानात चोरी झाल्याचे कळविले़ कन्हैय्यालाल यांनी लागलीच दुकान गाठले. त्यावेळी त्यांना दिलीप वालेचा व त्यांचे दुकान चोरट्यांनी फोडलेले दिसून आले़ दिलीप वालेच्या यांच्या दुकानातून पाचशे रूपये व त्यांच्या दुकानातूनही पाचशे रूपयांची रक्कम आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. तर कुलूप तुटलेले बघायला मिळाले. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सोनार करीत आहे.