फुप्पुसांना सूज , कमरेखाली थकवा ; साताऱ्यात विचित्र आजाराची दहशत

 

सातारा : वृत्तसंस्था । फुप्पुसांना सूज आणि कमरेखाली थकवा जाणण्याचा त्रास असून पण कोरोना , डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याने नेमके निदान न होणाऱ्या आजाराची सध्या साताऱ्यात दहशत आहे

 

शहरात सदरबझार परिसरात काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया साथीचे थैमान सुरु आहे. मात्र,काही रुग्णांचा कोरोनासह डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तपासणी अहवाल निगेटिव्ह असूनही, त्यांना फप्फुसाला सूज व कमरेखाली थकवा जाणवत आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने अनेकजण सध्या या विचित्र आजाराने त्रस्त आहेत. यामुळे आता आरोग्य यंत्रणेसमर नवे आव्हान निर्माण झाल्याचे दिसत आहे.

 

सदरबझार परिसरात काही दिवसांपासून डासांचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे तिथे डेंग्यू, मलेरियासह, चिकनगुनियामुळे अनेकजण आजारी पडले आहेत. अनेकजण खासगी डॉक्टर्सकडून उपचार घेत असून एकीकडे कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे या साथीच्या आजारांनी सदरबझारकर सध्या हैराण झाले आहेत.

 

पालिकेकडून डासांची वाढ रोखण्यासाठी फवारणी केली जात आहे. मात्र, अजून उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. पालिकेने या परिसरात वाढलेल्या साथीच्या आजारांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.

 

डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियामुळे आजारी पडलो असेन म्हणून नागरिक अगदी आरपीटीसीआर या तिन्ही आजारांच्या टेस्ट करत आहेत. सर्व चाचणी अहवाल नकारात्मक येत आहेत. लक्ष्मी टेकडीवरील व जवान हौसिंग सोसायटीतील सुमारे २५ घरातील नागरिकांच्या या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. तरी देखील ते सध्या या विचित्र आजाराने त्रस्त आहेत. अंगदुखी, ताप, थंडी अशी लक्षणे असून ती कमी होत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.