फळांची रोपे वाटून वडिलांचा वाढदिवस केला साजरा

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांचा स्तुत्य उपक्रम

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बृहन्मुंबई महानगरपालिकेत उद्यान अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले नगरदेवळ्याचे भूमिपुत्र जितेंद्र परदेशी यांनी आपले वडील विठ्ठलसिंग गोकुळसिंग परदेशी यांचा ८५ वा वाढदिवस गावात पंधराशे फळझाडांची रोपे वाटून साजरा केला. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.

 

जितेंद्र परदेशी यांच्या फळांची रोपे वाटून वडिलांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल, तहसीलदार कैलास चावरे,  किरण काटकर ,मुस्लिम सोसायटीचे चेअरमन गनीशेठ, अध्यक्ष विनोद परदेशी उपस्थित होते.  निसर्गाचा समतोल साधण्यासाठी असे वाढदिवस साजरे करून प्रत्येकाने एक झाड जगवावे असे आवाहन  करत प्रांत विक्रम बांदल यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.  तहसीलदार कैलास चावरे यांनी वृक्षसंवर्धन करणे किती आवश्यक आहे ते उदाहरणासह पटवून दिले. प्रमुख उपस्थित पाहुण्यांचा व सत्कारमूर्ती विठ्ठलसिंग परदेशी यांचा शाल श्रीफळ व फळझाड देवून सत्कार क्षत्रिय परदेशी समाजाकडून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,गावातील विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, उपस्थित होते.  सूत्रसंचालन सौरभ तोष्णीवाल यांनी तर आभार पुंडलिक कोळी यांनी केले.  यशस्वीतेसाठी प्रदीप परदेशी, शैलेंद्रसिंग परदेशी, सुनील परदेशी, प्रकाश परदेशी, महेंद्र परदेशी, अरविंद परदेशी, कपिल परदेशी, रुपेश परदेशी, दिपक बैरागी , प्रज्योत परदेशी, सर्व क्षत्रिय परदेशी समाजाचे कार्यकर्ते यांनी कामकाज पाहिले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.