प्लाझ्माफेरेसीस थेरपी हे रामबाण सिद्ध होईल : ना. गुलाबराव पाटील

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे व बाधित रुग्ण आहेत त्यावर प्रभावी उपचार करण्याच्या दृष्टीकोनातून प्लाझ्माफेरेसीस थेरपी हे रामबाण सिद्ध होईल व रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ होईल अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

store advt

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटल रक्तपेढिमध्ये ऑन लाईन व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे उद्घाटन केले. रेडक्रॉस भवन येथील सभागृहात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उद्घाटन सोहळ्यास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्लाझ्मा दात्यांचा सत्कारप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभीजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जप्रकाश रामानंद, प्रा.डॉ. घोडके व प्रा. डॉ. विजय गायकवाड तसेच शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. उमेश कोल्हे तसेच रेडक्रॉसचे पदाधिकारी उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नाकुमार रेदासनी, राजेश यावलकर, अनिल कांकरीया, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला, डॉ. अपर्णा मकासरे ), पुष्पाताई भंडारी, डॉ. विजय चौधरी , प्लाझ्माफेरेसीसचे दाते, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मिलिंद बुवा, रेडक्रॉसचे रक्तसंक्रमण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!