प्रा. पी. जी. अभ्यंकर यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी । शैक्षणीक व क्रीडा क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे प्रा. पी.जी. अभ्यंकर (वय ८६) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.

store advt

प्रा. पी.जी. अभ्यंकर हे शहरातील मुलजी जेठा महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकीक होता. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले क्रीडा संचालक म्हणून त्यांनी अविस्मरणरीय कामगिरी बजावली होती. क्रीडा क्षेत्रातील महनीय व्यक्तीमत्व म्हणून ते ख्यात होते. आज सकाळी नऊ वाजता त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने शैक्षणीक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील एक मातब्बर व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्‍चात एक मुलगी, मुलगा सुन व नातवंडे आहेत. त्या महाराणा प्रताप महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका समिधा सोहनी आणि पोलीस उपनिरिक्षक विश्राम अभ्यंकर यांचे वडील होत.

error: Content is protected !!