प्राणघातक हल्ल्या प्रकरणी पीएसआयसह पाच जणांना शिक्षा

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । इंधवे येथील सरपंचावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षकासह पाच जणांना आज येथील न्यायालयाने पाच वर्षांच्या शिक्षेसह दंड ठोठावला आहे.

store advt

याबाबत वृत्त असे की, ३० जानेवारी २०१८ रोजी इंधवे (ता. पारोळा) येथील सरपंच जितेंद्र गुलाबराव पाटील यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला चढविला होता. यात त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले होते. यात ते जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलीस दलात पीएसआय म्हणून कार्यरत असणारे हरीश्‍चंद्र माधवराव पाटील, योगेश माधवराव पाटील, शरद विश्‍वास पाटील, दीपक अधिकराव पाटील, दीपक हिंमतराव पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील हरीश्‍चंद्र पाटील याने जामीनासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागितली होती. तथापि, त्याला दिलासा मिळाला नव्हता. यामुळे अखेर त्याला ५ जून २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.

दरम्यान, अमळनेर येथील न्यायालयात हा खटला चालला. यात न्यायाधिशांनी हरीश्‍चंद्र माधवराव पाटील, योगेश माधवराव पाटील, शरद विश्‍वास पाटील, दीपक अधिकराव पाटील, दीपक हिंमतराव पाटील यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!