प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांचा सत्कार

सत्कारमूर्तींची कृतज्ञतेची भावना

फैजपूर : प्रतिनिधी । प्रांताधिकारी व कोरोना महामारी नियंत्रण अधिकारी म्हणून डॉ थोरबोले यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारास उत्तरं देतांना प्रांताधिकारी यांनी सर्व लोकप्रतिनिधी , कार्यकर्ते व पत्रकार यांनी मला काम करताना मोठी साथ दिली यामुळे लोकसभा , विधानसभा निवडणूक व कोरोना नियंत्रण अशी मोठी कामे यशस्वी पार पडली. फैजपूर येथील जनतेचे प्रेम मी सदैव हृदयात साठवुन ठेवील फैजपूरमध्ये काम करतांना खूप शिकायला मिळाले, मोठा मित्र परिवार मिळाला विशेष म्हणजे माझे कारकिर्दीत झालेला 27 कुंडी महाविष्णू याग महोत्सव माझे कायम स्मरणात राहील , अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार नरेंद्र नारखेडे यांनी केले. वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत चेअरमन मनोजकुमार पाटील, चंद्रशेखर चौधरी, पंडितराव कोल्हे , विजयकुमार परदेशी, अनिल नारखेडे, राजू महाजन, किरण चौधरी, नगरसेवक देवेंद्र साळी , भागवत पाटील, डॉ प्रशांत पाटील, डॉ गिरीश लोखंडे, योगेश भावसार, डॉ पद्माकर पाटील, सुभाष गलवाडे, मयूर नारखेडे व राजू मिस्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.