प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची झोपेतच निर्घुण हत्या

शेअर करा !

प्रयागराज (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. अख्खं कुटुंब झोपेत असताना हे हत्याकांड घडले.

store advt

विमलेश पांडेय, त्याचा मुलगा सोमू (वय २२), शिबू (वय १९), प्रिन्स (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. विमलेश याची पत्नी गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पटेलनगरच्या शुकुल गावात ही घटना घडली. विमलेश पांडेय (वय ४०) हे आपल्या कुटुंबासहीत घरात झोपले होते. या चौघांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गावातील काही लोकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली आहे. कुटुंब प्रमुख असलेला विमलेश हा वैद्य होता. विमलेश आणि कुटुंबीयांचे कुणाशीही वैर नाही. त्यामुळे त्यांची हत्या कुणी केली असावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, कानपूरमध्ये कुख्यात गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर बेछुट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात अधिकाऱ्यासह आठ पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. ही घटना घडली असतानाच, प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!