प्रभाकर सोनवणे यांना विधान परिषदची उमेदवारी मिळावी

 

यावल, प्रतिनिधी । एसटी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी कॉंग्रेसचे निष्ठावंत प्रभाकर अप्पा सोनवणे यांना विधान परिषदची उमेदवारी मिळावी यासाठी महसुल मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हा काँग्रेसतर्फे मागणी करण्यात आली आहे.

पत्राचा आशय असा की, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड संदीपभैय्या पाटील यांच्या आदेशानुसार तसेच आमदार शिरीष चौधरी यांना विनीत आणि जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजबराव पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सर्वधर्म समावेशक असल्येल्या कार्यकत्याला राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणुन एसटी समाजाच्या तुलनेत कोळी समाजाचे नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात या समाजाचा इतरांच्या बरोबरीत मास लीडर म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. ते पक्षवाढ करण्यासाठी कायम तत्पर असलेल्या आणि मागील काँग्रेस पक्षाचे चळवळीतील एकनिष्ठ असलेल्या नारायणअप्पा सोनवणे यांचे सुपूत्र आणि जळगाव जिल्हा परिषदचे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे आक्रमक व्यक्तिमहत्व असलेले प्रभाकर नारायण सोनवणे यांची आपण एक सर्वसमावेशेक प्रतिनीधी म्हणुन निवड करावी व एस टी समाजाचा सन्मान करावा ही विनंती. तशी विनंती आपण सरकार मार्फत राज्यपाल यांना करावी ही आग्रहाची विनंती. आपण ही विनंती मा. मुख्यमंत्री पाठोपाठ सर्वांना कराल हीच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकत्यांची आणि सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आणि इच्छा आहे.

Protected Content