प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ता मोकळा करून द्या : शिवसेनेची मागणी

शेअर करा !

सावदा, प्रतिनिधी । शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून जाणारा रस्ता मोटरसायकल व पायी जाणाऱ्यांसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद पाटील यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर हा नगरपालिका प्रशासनतर्फे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असतो. यात काही प्रतिबंधित क्षेत्र हे मुख्य रस्त्यावर येत असल्याने यात काही सुधारणा करून या क्षेत्रातून जाणारा रस्ता मोटर सायकल व पायी जाता येईल असा मोकळा करण्यात यावा. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर परिसरातील नागरिकांना त्या रस्त्याने जाण्याचा त्रास कमी होईल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र लहान करून पायी व मोटरसायकल जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना महानगराध्यक्ष मिलिंद पाटील, शाम पाटील, शरद भारंबे, धनंजय चौधरी, अनिल लोखंडे, भारत नेहते आदींच्या स्वाक्षरी आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!