प्रताप सरनाईकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबियांवर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. यानंतर सरनाईक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली. यात सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह १० ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ङ्गसामनाफ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

—————-

 

Protected Content