Home धर्म-समाज प्रजासत्ताक दिनी ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

प्रजासत्ताक दिनी ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

0
32

पाचोरा, प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयात ५० लक्ष रुपयांच्या ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवार दि. २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचा लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून उपस्थिती देण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound