जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त जामनेर येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र महाजन यांचा पायोनियर कंपनीतर्फे सत्कार करण्यात आला.
माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २३ डिसेंबर रोजी भारतात ‘शेतकरी दिन’ साजरा केला जातो. याचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र महाजन हे शेतीत नवनवीन प्रयोग करणारे तसेच प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जाता… त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नुकतेच त्यांना वसंतराव नाईक तसेच उद्यानपंडित असे कृषी शेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून पायोनियर कंपनीतर्फे राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे झोनल मॅनेजर तसेच जामनेर चे सेल्स ऑफिसर प्रमोद जाधव यांनी राष्ट्रीय शेतकरी दिवसा मागील भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद जाधव तर आभार विठ्ठल गोरे यांनी मानले