पोलीस अधीक्षक कार्यालयात तरुणांचा आरडाओरड करत गोंधळ

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षाजवळ बुधवारी सायंकाळी काही तरुणांनी आरडाओरड करत गोंधळ घातला तसेच झोंबाझोंबी केल्याची घटना घडली. गोंधळ घालणाऱ्या ८ तरुणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षाजवळ काही तरुण हे आरडाओरड करुन गोंधळ घालत असून शांततेचा भंग करत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठले. व परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन गोंधळ घालणाऱ्या गौरव समाधान सोनवणे रा. गुजराल पेट्रोलपंपजवळ, निमखेडी शिवार, प्रसाद कमलाकर पाटील वय १८ रा. निवृत्तीनगर, मोहित संदीप पाटील, संतमिराबाई नगर, पिंप्राळा, प्रथमेश सुरेश साळुंखे, ओमशांतीनगर, खुशाल गोकूळ पाटील, ओझानगर, निमखेडी शिवार, निरज जितेंद्र सुर्यवंशी, आर.एल.कॉलनी, पिंप्राळा, निर्भय शीतल शिरसाठ रा. प्रबुध्द नगर पिंप्राळा व तेजस सुहास गोसावी रा.दादावाडी मंदिराजवळ, जळगाव यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content