पोलीसांच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना जिल्हाबंदीचे आदेश

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अक्षय तृतीया, रमजान ईद आणि परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एमआयडीसी पोलीस हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हा न्यायालयाने १५ दिवसांसाठी जिल्हाबंदी करण्याचे आदेश सोमवार २ मे रोजी दुपारी दिला.

 

जिल्ह्यात अक्षय तृतीया, रमजान ईद व परशूराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव आणि मयुर देविदास बागडे रा. मच्छिबाजार तांबापूर या दोघांना पोलीसांनी अटक केली. यातील दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर हाणामारी, घरफोडी, जबरी चोरी असे १५ गुन्हे दाखल आहेत तर मयुर देविदास बागडे याच्यावर मारामारी, चोरी व अवैध दारू सोबत बाळगणे असे ५ गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी दोन्ही गुन्हेगारानां सोमवार २ मे रोजी न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने दोघांना १५ दिवसांसाठी जिल्हाबंदीचे आदेश दिले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ नितीन पाटील, पोलीस नाईक इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, गोविंदा पाटील, किशोर पाटील, इमरान बेग यांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!