पैशांच्या वादातून चौघांना लाकडी दांड्यासर धारदार वस्तूने मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हेवाडा परिसरात पैशांच्या देवाण घेण्याच्या वादातून महिलेसह चौघांना लाकडी दांडा व धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी ४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

या संदर्भात माहिती अशी की, जळगाव शहरातील कोल्हे वाडा या परिसरात चेतन आनंद मिस्तरी (वय-२४) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ, वहिनी आणि वडील हे देखील वास्तव्याला आहे. रविवारी ४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पैशांच्या वादातून गल्लीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांनी  चेतन आनंद मिस्तरी, चेतनचे वडील अनंत मिस्तरी, भाऊ रूपेश अनंत मिस्तरी, वहिनी शुभांगी रूपेश मिस्तरी यांना लाकडी दांडा आणि धारदार वस्तून मारहाण करून गंभीर जखमी केले. यात चेतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content