पूर्व प्राथमिक विभागाने ऑनलाईन पद्धतीने साजरा केला ‘ यलो कलर डे’

 

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागात “यलो कलर डे” ऑनलाईन पद्धतीने साजरा केला.

ऑनलाईन “यलो कलर डे” निमित्ताने विद्यार्थ्यांनी त्यांना रोज दिसणाऱ्या तसेच वापरण्यात येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या वस्तू टेबल वर मांडण्यात आल्या त्यांचा परिचय व पिवळ्या रंगाची ओळख करून देण्यात आली. रंगाची ओळख पक्की व्हावी यासाठी पी.पी.टी. द्वारे पिवळ्या रंगाची ओळख करून दिली. त्याचा व्हिडिओ करून विद्यार्थ्यांच्या what’s app group वर दाखविण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य अमितसिंग भाटिया आणि समन्वयिका अनघा सागडेचे मार्गदर्शन लाभले. मीनाक्षी देवताळू व सारिका कुलकर्णी कार्यक्रम प्रमुख होत्या.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.