पु.ना.गाळगीळ येथे “तरूणांची चित्रकला प्रदर्शनी”चे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ग्रीन ह्यूमन फाऊंडेशनच्यावतीने नुकतेच पु.ना. गाळगीळ यांच्या दालनात तरूणांची चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन मुंबईतील विश्वास साहनी यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून ग्रीन ह्यूमनच्या सदस्यांनी गरजू व मध्यम वर्गातील मुलांना कलेचा धडा शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या माध्यमातून आता चित्रकला प्रदर्शनीमध्यमातून मध्यम वर्गातील मुलांनी कमी संसाधनाच्या माध्यमातून उत्कृष्ठ दर्जेच्या कलाकृती उभारलेल्या आहेत. या अनुषंगाने उभारलेल्या चित्रकलेला एक नवी भरारी मिळावी यासाठी ग्रीन ह्यूमन फाऊंडेशनने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. जिथे एक कलाकाराचे पेन्टींग्स नव्हे तर तरूणांनी तयार केलेल्या पेन्टींग्सची प्रदर्शनी आयोजित करण्यात आले आहे. १८ मे रोजी सायकाळी ७ वाजता मुंबई येथून विश्वास साहनी यांच्याहस्ते तरूणांची चित्रकला प्रदर्शनीचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले. आयोजित केले चित्रकला प्रदर्शनी १८ मे ते ३० मे दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजेदरम्यान पु.ना. गाळगीळ येथील हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनीला जळगाव शहरातील चित्रकला प्रेमी यांनी भेट देवून प्रोत्साहन देण्यात यावे असे आवाहन आयोजन ग्रीन ह्यूमन परिवार यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content