पुर्वीप्रमाणे गुंतवणुकीसाठी आता प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागेल

लॉकडाउनचा फटका बसून कमालीची घट

मुंबई : वृत्तसंस्था । मार्चमध्ये गुंतवणुकीसंदर्भातील जी परिस्थिती होती ती सहा महिन्यानंतरही जैसे थे आहे. गुंतवणुकीला लॉकडाउनचा फटका बसून कमालीची घट झाली आहे. पुन्हा पुर्वीप्रमाणे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आता बराच काळ वाट पहावी लागणार आहे.

द सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमी या थिंक टॅकने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउनआधी प्रत्येक तिमाहीमध्ये भारतात तीन ते चार अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव यायचे. चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही गुंतवणूक दुप्पटीने वाढायची.

लॉकडाउनच्या पुर्वी सर्वाधिक गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून झाली होती. सरकारी संस्थांनी त्यावेळीच्या एकूण गुंतवणुकीपैकी ४४ टक्के गुंतवणूक केली होती इतर हिस्सा खासगी क्षेत्रातील नवगुंतवणुकदारांचा होता. आता सरकारने २५८ अब्ज रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. २५८ अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीचे हे प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारांचे एकत्रित प्रस्ताव आहे. मागील १६ वर्षांमधील ही सर्वात कमी प्रस्तावित गुंतवणूक आहे. जून २००४ नंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी पहिल्यांदाच एवढ्या कमी प्रमाणात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे.

एकीकडे सरकारने २५८ अब्ज गुंतवणुकीची तयारी दर्शवली असतानाही खासगी क्षेत्राने हात आखडता घेतला आहे. खासगी क्षेत्राने ३२८ अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून हा सुद्धा २००४ नंतरचा निच्चांक आहे. सन २०२०-२१ मध्ये १.३ ट्रिलियन रुपयांचे एकत्रित नवीन गुंतवणूकीचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूक पाच ट्रिलियन करण्याचे उद्देश लांब राहिल्याचे चित्र आहे. २००४-२००५ पासून कधीही गुंतवणूक ही पाच ट्रिलियनच्या खाली नव्हती. त्यामुळे यंदाची परिस्थिती ही खूपच चिंताजनक आहे.
केंद्र सरकारने ठरवल्यास ही परिस्थिती बदलू शकते केंद्राने सार्वजनिक बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होईल मात्र सध्या तरी केंद्र अशापद्धतीने कोणताही मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत दिसत नाहीय. रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या निर्णयांसंदर्भातील सरकारच्या चिंता अधिक वाढण्याची चिन्ह आहेत.

जूनमधील तिमाहीसाठी ५६१ अब्ज प्रस्तावित गुंतवणूक येणं अपेक्षित होतं. जूनच्या तिमाहीमध्येच लॉकडाउनचा फटका बसण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाउनचे कठोर नियम होते. नवीन गुंतवणूक झालीच नाही. नवीन गुंतवणूक ही कधीच शून्य असू शकत नाही असं सांगितलं जातं. मात्र या कालावधीमध्ये काहीच गुंतवणूक न झाल्याने ती अगदीच नगण्य म्हणजे शुन्यासमान होती. नियोजित ५६१ अब्जांची गुंतवणूक झालीच नाही.

दोन हजार ३२९ कंपन्यांच्या अभ्यास केला त्यापैकी अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकीपैकी सर्वात निच्चांक म्हणजे १.९८ टक्के वापर केला. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार बुडाल्याने कमाईमध्ये घट झाली रोजगार आणि कमाईचे आकडे पुन्हा आधीप्रमाणे नक्की कधीपर्यंत होतील हे सांगता येत नाहीय परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत कॉर्पोरेट कंपन्या विस्तारा ऐवजी व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित करतील .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.