पुण्यात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग ; आरोपी वॉर्डबॉयला अटक

शेअर करा !

पुणे (वृत्तसंस्था) हडपसरमधील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील वॉर्डबॉयने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी अशोक नामदेव गवळी (वय ४०, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) नामक आरोपीला अटक केली आहे.

store advt

 

या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर हडपसर पोलिसांनी या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच विनयभंगप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे. दरम्यान, थोड्याच दिवसापूर्वी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला होता. यानिमित्ताने महिलांचा सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!