पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता !

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) हवामानातल्या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

store advt

 

बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानाच्या या बदलांमुळे सुमुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठा प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेगही मोठा प्रमाणात असेल. यादरम्यान, समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात उतरू नका असे आवाहन करण्यात आले आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जोरदार पाऊस होईल. घाट भागात तर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!