पुढच्या आठवड्यात भारतात सर्वोच्च रुग्णवाढ केंद्रीय तज्ज्ञांचा इशारा

 

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पुढच्या आठवड्यात देशभरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्र सरकारला कोरोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

 

गेल्या महिन्यात झालेल्या चर्चेदरम्यान, आपण दीर्घ काळासाठीच्या उपाययोजनांमध्ये फार वेळ न घालवता आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीवर तातडीने पावलं उचलणं गरजेचं असल्याचा संदेश पथकानं केंद्र सरकारला दिला असल्याची माहिती पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी दिली आहे. एकीकडे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीच्या डोसचा अपुरा पुरवठा असताना रुग्णवाढीचं आव्हान समोर उभं ठाकणार असल्याचा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.

 

 

संशोधकांच्या या पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर म्हणाले . “आमचा अंदाज आहे की पुढच्या आठवड्यात ३ ते ५ तारखेच्या दरम्यान भारतात रोजची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली जाण्याची शक्यता आहे. २ एप्रिलला झालेल्या चर्चेदरम्यान आम्ही सांगितलं होतं की सरकारने जुलै किंवा ऑगस्टमध्ये अंमलात येईल अशा उपाययोजनांवर काम करणं अनावश्यक आहे. कारण तोपर्यंत दुसली लाट संपलेली असेल, पण पुढचे ४ ते ६ आठवडे आपण हा लढा कसा देणार आहोत, ते ठरवणं आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात खूप सारा वेळ खर्च करू नका. कारण हे संकट आत्ता तुमच्या समोर उभं आहे”, असं विद्यासागर यांनी सांगितलं.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.