पी.आर.हायस्कूलमध्ये रंगली गीतगायन स्पर्धा

शेअर करा !

dharangaon 2

धरणगाव प्रतिनिधी । पी.आर हायस्कुल परानंद शतकोत्तरी 106वा वर्धापनदिननिमित्त जिल्हास्तरिय गीतगायन स्पर्धेचे संयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील एकाहुन एक सरस स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन अॅड.संजय बोरसे यांच्याहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरूण कुलकर्णी प्रमुख अतिथी डॉ.मिलिंद डहाळे, अजय पगारिया हे होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक विकास चव्हाण (हरणाताई जोशी विद्यालय चाळीसगाव), द्वितीय क्रमांक योगेश चवरे (जि.प.केंद्रशाळा नाचणखेडे ता.जामनेर) तर तृतीय क्रमांक महेंद्र देवरे-धरणगाव यांनी पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून मदनकुमार भोई, प्रदीप कोळी यांनी पटकावला. विजेत्यांना मान्यवरांसह महिला व बालकल्याण सभापती उज्वलाताई म्हाळके यांच्याहस्ते रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एन.चौधरी यांनीही गित सादर करुन प्रास्तविक केले. अमृतकर, डॉ. संजिवकुमार सोनवणे पर्यवेक्षक यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हायस्कुलच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. सुत्रसंचलन तसेच संयोजन नवनित सपकाळे सर यांनी केले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!