पीडितेच्या भावाचा नंबर सॅनिटायझर नावाने सेव्ह

मुख्य आरोपी संदीपची हुशारी

हाथरस: वृत्तसंस्था । हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडात कॉल डिटेल रेकॉर्ड उघड झाल्यानंतर गुंता सैल होत आहे. चंदपा परिसरातील गावात सामूहिक बलात्कार गुन्ह्यात आरोपी म्हणून ४ तरुण तुरुंगात आहेत. मु्ख्य आरोपी संदीप याने पीडितेच्या भावाचा मोबाइल नंबर सॅनिटायझर या नावाने सेव्ह केला होता,

मुख्य आरोपी संदीप याचे पीडित कुटुंबीयांशी बोलणे होत होते असे स्पष्ट झाले आहे. मात्र, आपण संदीपशी कोणत्याही प्रकारचे बोलणे केलेले नसल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आमच्या विरोधात रचण्यात येत असलेला हा कट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पीडितेच्या भावाचा मोबाइल नंबर सीडीआरमधून काढल्यानंतर आरोपी संदीप आणि त्यांच्यादरम्यान १०४ वेळा बातचित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आपण नोएडा येथे मजुरी करत होतो असे पीडितेच्या भावाचे म्हणणे आहे. माझा मोबाइल फोन हरवल्यानंतर मी दुसरे सिम घेतल्याचे तो सांगतो. फोनवर बोलण्याची रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर ती आपल्याला ऐकवावी, अशी पीडितेच्या भावाची मागणी आहे.

मार्चच्या सीडीआरमध्ये आरोपी आणि पीडितेच्या भावामध्ये सुमारे ५ तास बोलणे झाले होते. मात्र हे बोलणे पीडितेच्या घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात होते तर आरोपीचे घर हे पीडितेच्या घराच्या २०० मीटर इतक्या अंतरावर आहे.

मी नोएडात भावासोबत राहत होतो आणि नोएडामध्ये काम करत होतो अशी माहिती पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने दिली. त्याच्या छोट्या भावाचे लग्न झालेले नाही. मोठ्यांची त्याची पत्नी गावातच राहत होती. आरोपीसोबत आपले कधीही बोलणे झालेले नसल्याचे पीडितेच्या भावाचे म्हणणे आहे. आमच्या विरोधात रचण्यात आलेले हे षडयंत्र असल्याचे त्याचे म्हणणे आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.