पीडितेच्या कुटुंबाला सरकारविरोधात बोलण्यासाठी ५० लाखांची लालूच !

हाथरसच्या चांदपा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अवधेश कुमार यांचा एफआयआर

लखनऊ: वृत्तसंस्था । हाथरसच्या पीडितेच्या कुटुंबाला सरकारविरोधात बोलण्यासाठी ५० लाखांची लालूच दाखवण्यात आल्याचा नवा आरोप समोर आला आहे . हा एफआयआर हाथरसच्या चांदपा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अवधेश कुमार यांनी दाखल केला आहे.

हाथरस गुन्हा कायद्याच्या डावपेचांमध्ये अडतच चालले असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी अनेक आरोपांमध्ये १९ एफआयआर दाखल केले आहेत. एफआयआर क्रमांक १५१ मध्ये मोठ्या षडयंत्राची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये राजद्रोह आणि षडयंत्रासह २० कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यात कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही.

 

पीडितेच्या कुटुंबाला एका सुनियोजित गुन्हेगारी षडयंत्राद्वारे फसवले गेले. असामाजिक घटकांनी पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्ये करण्यासाठी ५० लाख रुपयांचे प्रलोभन दिले गेले. असामाजिक घटक वर्ग आणि जातीला भडकवून राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करीत होते. सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगावे यासाठी पीडितेच्या कुटुंबावर पुन्हा पुन्हा दबाव आणला गेला, पहिल्या तक्रारीत पीडितेच्या कुटुंबाने मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले होते. राज्य सरकारची प्रतिमा कलंकित करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला. सोशल मीडियावर लोकांना भडकवण्यासाठी सर्व खोटे फोटो आणि ऑडिओ व्हायरल करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारची प्रगती पाहून काही लोक हाथरस घोटाळ्याचा गैरफायदा घेत आहेत. हाथरसमध्ये मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे. आम्ही सत्य शोधून काढू, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सोमवारी दाखल केलेल्या खटल्याबाबत म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.