पीडितेचा भाऊ व आरोपीच्या नामसाधर्म्याचा नवा पेच

हाथरसच्या आरोपींचा निर्दोष असल्याचा पोलिसांसमोर दावा

हाथरस: वृत्तसंस्था । पीडिता आपल्या पहिल्या जबाबात एकच नाव घेत होती, पीडितेचा भाऊ आणि आरोपीची नावे समान असल्याचे आरोपीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. हाथरस सामूहिक बलात्कार आणि मृ्त्यू गुन्ह्यात तुरुंगातून आरोपींनी हाथरसच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनीच पीडितेची ऑनर किलिंग केले असल्याचा या आरोपींनी आरोप केला आहे. प्रथम कॉल डीटेल आणि त्यानंतर आरोपींचे पत्र आल्यानंतर आता नावाच्या दाव्याबाबतचा मुद्दा उपस्थित झाल्याने हासरथ तपासाचा गुंता अधिकच वाढला आहे.

घटना घडल्यानंतर पीडित मुलीने सुरुवातीला एकच नाव घेतले होते आणि तिच्या भावाचेही नाव तेच आहे, असे एका आरोपीच्या चुलत्याने म्हटले आहे. त्यानंतर ठाकूराच्या मुलाने माझा गळा दाबला असे पीडितेने आपल्या आईला सांगितले, असे हा चुलता म्हणाला.

‘ दुसरा आरोपी लवकुश याच्या भावाने देखील म्हणणे मांडले आहे. पीडित मुलीची आई आणि भाऊ तेथेच चारा कापत होते. आम्ही दुसऱ्या बाजूला होतो. जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आम्ही पाहायला गेलो. माझ्या आईने माझ्या भावाला सागितले की, लाला पाणी भरून आण नाहीतर ही मरून जाईल. माझा भाऊ पाणी घेऊन आला आणि त्याने तिला पाणी पाजले, असे लवकुशचा भाऊ म्हणाला.

पीडित मुलीला न्याय मिळावा असे आम्हालाही वाटते, असे आरोपीच्या एका नातेवाईकाने म्हटले आहे. जे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळायला हवी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत. सीबीआय, नार्को, एसआयटी असा कोणताही तपास करा, जर ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा द्या, असे हा नातेवाईक म्हणाला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.