पिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कृषि कार्यालयावर धडक

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कोळगाव महसूल मंडळातील पिचर्डे, बात्सर, प्रिंप्रीहाट,पांढरद व बोदर्डे परिसरातील गावांना पीक विमा लाभ मिळावा या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी भडगाव तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे यांनामागणीचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२२-२३ या वर्षाच्या हंगामामधील केळी पीक विमा लाभापासून वंचित ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एका वर्तमानपत्रात दिलेल्या वृत्तानुसार कोळगाव मंडळाच्या बाजूला शिवनी, खेडगाव, वडजी या गावातील शेतकरी विमा लाभ घेत आहे. आणि भौगोलिक दृष्ट्या एकाच सर्कलमध्ये असणारी  पिचर्डे, बात्सर, प्रिंप्रीहाट,पांढरद व बोदर्डे  पिक विमाच्या लाभापाासून वगळण्यात आले आहे. हे गावे कोळगाव मंडळातून कोणत्या निकषावरून वगळण्यात आले आहे. याचा खुलासा द्यावा तसेच इतर गावे कोणत्या निकषावर घेण्यात आलेले आहे हे देखील सांगण्यात यावे. पिक विमाचा लाभ मिळावा या मागणीसाठी भडगाव तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेतली. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोर्डेसाहेब ,व तहसीलदार मुकेश हिवाळे यांना पिकविमा व अनुदान संदर्भात निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनावर पुरुषोत्तम महाजन, सुधाकर पाटील, स्वदेश पाटील, सोमनाथ पाटील, विनोद बोरसे, योगेश महाजन, मंगेश सोनवणे, प्रकाश महाजन, दीपक पाटील, किशोर येवले ,दीपक महाजन, नरेश पाटील, भूषण पाटील, दीपक महाजन, सोमनाथ पाटील, दिलीप पाटील यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते

Protected Content