पिंप्री येथे ना. गुलाबराव पाटील यांची गुळ तुला

शेअर करा !

gud tula

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची येथील कार्यक्रमात गुळ तुला करण्यात आली.

पिंप्री येथे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनी आयोजित केलेल्या सत्काराप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची गूळ तुला करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जळगाव पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, धरणगाव नगराध्यक्ष नीलेश चौधरी, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, रमेश पाटील, गोपाल पाटील, दीपक राजपूत, डी. ओ. पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, जि. प. सदस्य गजू सोनवणे, मनोज पांडे, अरूण बडगुजर, पिंपळेसीम सरपंच व्ही. डी. पाटील यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले. त्यांनी सोनवद येथील बंधार्‍यासाठी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहितीदेखील दिली. या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!