पिंप्राळा हुडको परिसरातील शगुफ्ता सईद भीस्ती (वय-३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुनील रामकृष्ण पाटील रा. जैनाबाद याने हे माझे घर आहे. ‘तु का खरेदी केले या कारणावरून शगुप्ता यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करत माझ्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली. या तक्रारीवरून सुनील रामकृष्ण पाटील यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
तर सुनील रामकृष्ण पाटील यांनीही या प्रकरणी तक्रार दिली असून घर का खरेदी केले असे म्हणत शगुफ्ता सईद भीस्ती, सहिद भीस्ती व इतर दोन जण यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांचा तपास पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील हे करीत आहेत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.