पिंपरीत तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

पिंपरी वृत्तसंस्था । शहरातील निगडी परिसरात दोन तर वाकड येथे अशा तीन घटना अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपहरणाची पहिली घटना आकुर्डी येथील गणेश अपार्टमेंट शिवशक्ती चौक येथे शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीची चुलत बहीण यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन चुलत बहिणीला अज्ञात आरोपींनी फूस लावून पळवून नेले आहे.

अपहरणाची दुसरी घटना चिंचवड येथील अजंठा नगर येथे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अपहरणाची तिसरी घटना पुनावळे येथील कैलास नगर ओव्हाळवस्ती येथे गुरुवारीच ४वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील सुनील पगारे (१९, रा. पुंडी, ता. अष्टी, जि. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपी पगारेने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.