पावसाचे पाणी साचल्यावरून कुटुंबाला बेदम मारहाण

पहूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधत गुन्हा दाखल

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील बिलवाडी गावात घराच्या छतावर पावसाचे पाणी साचल्यावरून तरूणासह आई वडील  व पत्नीला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात बुधवारी ३ मे रोजी सकाळी ८ वाजता पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय विकास पाटील (वय-२५) रा. बिलवाडी ता. जामनेर हा तरूण आई व पत्नी यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. घराच्या छतावर पावसाचे पाणी साचल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे नाना बाजीराव पाटील, प्रविण नाना पाटील, जितेंद्र नाना पाटील, शुभांगी प्रविण पाटील, साधना जितेंद्र पाटील सर्व रा. बिलवाडी ता.जामनेर यांनी ३० मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अक्षय पाटील तसेच त्यांची आईवडील व पत्नी यांना लाकडी काठी, दगडाने बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच आमच्या नांदी लागले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अक्षय पाटील याने बुधवारी ३ मे रोजी सकाळी ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content